आमीर खानला साकारायचीय शिवाजी महाराजांची भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता आमीर खान याचा आज 54 वा वाढदिवस. आमीरने त्याच्या वांद्रे येथील बंगल्यावर पत्रकारांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची असल्याचे सांगितले. 2019 मध्ये येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांविषयी बोलत असताना आमीरने हे सांगितले.

‘सध्या आपल्याकडे ऐतिहासिक चित्रपट येतात ही खूप चांगली गोष्ट आहे. पूर्वी असे चित्रपट बनवायचा कुणी विचार करत नव्हते. आपला इतिहास खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचा नीट अभ्यास करूनच हे चित्रपट बनवले गेले पाहिजे. मला जर संधी मिळाली तर शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला आवडेल. मला नेहमी असं वाटतं की मी त्यांच्या सारखा दिसतोही’, असे आमीरने यावेळी सांगितले.