‘लोया प्रकरणात अमित शहांची चौकशी होणार?’

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानीमध्ये सध्या दिल्ली सरकार विरुद्ध सचिव आणि भाजप असा वाद रंगला आहे. दिल्ली पोलीस शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोहोचली. या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भलतेच संतापले असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्या तीव्रतेने आणि सर्व बाजूने सचिव मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू आहे, याचा मला अत्यंत आनंद वाटतो. पण आता न्यायमूर्ती लोया प्रकरणात भाजपच्या राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांच्या चौकशीची हिम्मत दाखवणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून आरोप करण्यात आले आहेत की पोलीस कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी दाखल झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानच पोलिसांनी ताब्यात घेतल्यासारखीच स्थिती असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांकडून लोकशाहीची हत्त्या करण्यात आल्याचीही टीकाही होत आहे. मोदी सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार पाडण्याचे हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या