मदरशांत गोडसे, प्रज्ञासिंहसारखे लोक तयार होत नाहीत, आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

105

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मदरशांमध्ये महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसारखे लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य करत सपा खासदार आझम खान यांनी नवा वाद निर्माण केला आहे. मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हे वक्तव्य केले.

मदरशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेवर बोलताना आझम खान यांनी मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक क्षिण दिले जाते. जर तुम्हाला खरच मदत करायची असेल तर तेथील शिक्षणाचा स्तर उंचावण्याकडे लक्ष द्या, असेही ते म्हणाले.
.

आपली प्रतिक्रिया द्या