टॅटू खूप आवडतात


अभिज्ञा भावे

तुझी आवडती फॅशन… – कम्फर्ट विथ ट्रेण्ड.

फॅशन म्हणजे?- तुमच्या व्यक्तिरेखेला व्यक्त करणारी किंवा तुमचा सध्याचा मूड दर्शवणारी.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की… – फक्त कपडे नाही. माझ्यासाठी फॅशन म्हणजे युनिक गोष्टींचा संग्रह करणे. मग ते काहीही असू शकते. मग तबलावाली एखादी बॅग किंवा माझे केस मी कसे बांधते हेसुद्धा माझ्यासाठी वेगळे फॅशन स्टेटमेंट असू शकते.

आवडती हेअरस्टाइल? – मोकळे केस, पण हल्ली हाय आंबाडा बांधते.

फॅशन जुनी की नवी?- जुन्या-नव्या अशा दोन्हीचे मिक्चर करायला आवडते. कारण जुन्यामध्ये वेगळी आणि नवीनमध्ये वेगळी मजा आहे. जुनं फारच रेअर असल्यामुळे पटकन लक्षात येतं आणि नवीन खूपच जास्त कम्फर्टेबल, आजच्या काळाला साजेसे आहे. दोन्हीचे मिक्चर केले की जास्त मजा येते.

आवडता रंग… – गुलाबी.

 तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते?- माझ्या  माणसांना वाटतं की मी तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळे कपडे घालते. पण तसे नाही. मी खूप मिक्स ऍण्ड मॅच करत असते. त्यामुळे मी जे घालते ते जवळच्या माणसांना आवडते.

 स्ट्रीट शॉपिंग आवडते का? प्रचंड आवडते. स्ट्रीटवर बरेच सरप्राईजेस मिळतात. म्हणजे खूप असं शोधल्यानंतर एखादा छानसा टॉप मिळतो ते एकदम सुखद असतं. स्ट्रीट शॉपिंग हिल रोड, लिंकिंग रोड, एल्को मार्केट कुठेही करु शकते. काही नाही तर अगदी मला रस्त्यावर काही चांगले आणि युनिक दिसले तर मी ते थांबून घेते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतेस ? कपडे. खूप कपडय़ांची शॉपिंग करते. ठरवून करते असे नाही पण मला एखादी गोष्ट आवडली की लगेच घेते.

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – चोकर्स.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठीइन्स्टाग्रामवर सर्फिंग करते. इंटरनेट हे अपडेट राहण्याचे मोठे माध्यम आहे.

ब्युटी सिक्रेट… – पुरेशी झोप. सब्जा आणि गुलकंद. उष्णतेचा प्रचंड त्रास असल्याने सतत ते पीत असते त्यामुळे माझी  स्कीन हायड्रेटेड असते.

टॅटू काढायला आवडतो का? – प्रचंड. दोन काढले आणि माझ्या वाढदिवसाला स्वतःलाच गिफ्ट केले होते.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी… – लिप बाम, मॉइश्चरायझर आणि आयब्रो पेन्सिल. या तीन गोष्टींशिवाय घराच्या बाहेरही पडत नाही.

फिटनेससाठी कोणताही आहार हा योग्य प्रमाणात खा. व्यायाम करा. मी आठवडय़ातून तीनदा व्यायाम करते.