पाकड्यांचा भुरटेपणा, वर्ल्डकपच्या जाहिरातील अभिनंदन यांची उडवली खिल्ली

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्डकप 2019 मध्ये 16 जून रोजी टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. आतापर्यंत वर्ल्डकप इतिहासात टीम इंडियाने प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केले आहे आणि यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती होईल. परंतु याच दरम्यान पाकिस्तानच्या एका चॅनेलने हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या वर्ल्डकप मॅच संदर्भात एक अत्यंत खालच्या पातळीवरील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातील पाकड्यांनी हिंदुस्थानी वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची खिल्ली उडवली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून नेटिझन्सने पाकड्यांवर हल्लाबोल केला आहे.

बालोकाट एअर स्ट्राईकवेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे विमान पाडले होते आणि याचवेळी त्यांचेही विमान कोसळले होते. यानंतर पाकिस्तानने त्यांना पकडले होते, परंतु अवघ्या दोन दिवसात त्यांची सुटका करण्यात आली. याच दरम्यान पाकिस्तानने अभिनंदन याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता आणि यात पाकिस्तानचा सैन्याधिकारी त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारताना दिसत होता. आता अशाच सिक्वेन्समध्ये पाकिस्तानच्या जॅज टीव्ही (Jazz TV)ने अतिशय बकवास जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

pakistan

अभिनंदन यांना ज्याप्रकारे चहा पिताना प्रश्न विचारण्यात आले तसेच जाहिरातीध्ये दाखवण्यात आले. जाहिरातीमध्ये दाखवलेल्या व्यक्तीला अभिनंदन यांच्यासारख्या मिशा लावण्यात आल्या आहेत. हा व्यक्ती हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. अभिनंदन यांच्या चौकशीची नक्कल या जाहिरातीत करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या