अभिनंदन यांची चौकशी पूर्ण!

abhinandan-comes-back-to-home

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मातृभूमीचे रक्षण करताना शत्रूच्या प्रदेशात उतरून भीम पराक्रम गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची चौकशी पूर्ण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते काही दिवस आरोग्य रजेवर जाणार आहेत. वायुसेनेचे वैद्यकीय पथक त्यांची आरोग्य चाचणी घेणार असून, त्यानंतर ते सेवेत कधी रुजू होणार हे निश्चित होईल.

पुलवामा हल्ल्याचा सूड घेण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन बालाकोट’ यशस्वी केले. त्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानात एफ-16 विमाने घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी वायुदलाने हा हल्ला परतवून लावला. यात अभिनंदन यांचे मिग पाकिस्तानात कोसळले आणि ते पकडले गेले. पाकिस्तानातून परत आल्यापासून अभिनंदन हे दिल्लीतच असून, लष्कर, वायुसेना तसेच गुप्तचर संस्थांच्या चौकशांना सामोरे गेले. या सर्व चौकशा आता संपल्या आहेत.