अभिनंदन यांची चौकशी पूर्ण, कुटुंबासोबत घालवणार वेळ

5

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होऊन आलेले हिंदुस्थानच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची चौकशी व त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अभिनंदन आता रजेवर जाणार असून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्याचे समजते.

अभिनंदन यांचे मिग विमान पाकिस्तानात कोसळले होते. अभिनंदन हे त्यातून सुखरूप बचावले, मात्र पाकडय़ांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर 1 मार्चला पाकिस्तानने वाघा बॉर्डर मार्गे अभिनंदन यांना पुन्हा हिंदुस्थानता पाठवले. हिंदुस्थानात परतल्यानंतर अभिनंदन यांच्या दिल्लीतील हवाई दलाच्या रुग्णालयात चाचण्या करण्यात आल्या तसेच तेथे त्यांची चौकशीही झाली. त्यानंतर जवळपास तेरा दिवसांनी आता अभिनंदन त्यांच्या घरी जाणार आहेत. तेथे काही दिवस ते कुटुंबासोबत घालवणार आहेत.

कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर पुन्हा एकदा अभिनंदन यांची फिटनेस चाचणी करण्यात येणार असून त्यानंतरच ते पुन्हा कधी कामावर रुजू होतील ते ठरविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या