काशी विद्यापीठात ‘अभाविप’चा धुव्वा, भाजपला झटका

सामना ऑनलाईन । वाराणसी

उत्तर प्रदेशात नगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपला काशी विद्यापीठातील विद्यार्थी संसद निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे. येथे अभाविपचा धुव्वा उडाला असून एकही जागा मिळाली नाही. समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा बंडखोर नेता राहुल दुबे हा २३६५ मते मिळवून विजयी झाला. राहुलने ‘अभाविप’च्या वाल्मीकी उपाध्याय याचा पराभव केला आहे.

भाजपची उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता असली तरी काशी विद्यापीठातील विद्यार्थी संसद निवडणुकीतील अभाविपला पराभवाचा सामना करावा लागला. जेएनयू, दिल्ली विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ आणि आता काशी विद्यापीठात अभाविपला जोरदार दणका बसला आहे.