टॅकरखाली चिरडून १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगावमध्ये खडकी रोड प्रभागात गॅस टँकरच्या धडकेत विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. वैष्णवी भगवान देवकर (१३) असे मृत मुलीचे नाव असून ती आठवीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे वैष्णवी सायकलवरून शाळेत जात होती. मागच्या बाजूने येणारा भारत गॅसच्या टँकरने (टँकर क्र – एमएच २६ डी १६२९) सायकलला जोरदार धडक दिली. जोरदार धडकेमुळे वैष्णवी सायकलवरून पडली आणि टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू जाला. चालक बाल्या बारहाते याने मुलीला प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मृत मुलीचे आई-वडील हरिद्वार-ऋषिकेश दर्शनासाठी गेले आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.