सटाणा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नाशिक

सटाणा-मालेगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रिक्षाला ट्रकने धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. या धडकेत रिक्षातील ७ प्रवासी जागीच ठार झाले. मृत्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, हे सात जण व्यापारी असल्याचे समोर येत आहे. रिक्षातून ते माल घेऊन जात होते. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…