मुंबईकडे येणाऱ्या गाडीला कामशेतजवळ भीषण अपघात, चार ठार

2

सामना प्रतिनिधी । पुणे

कामशेतजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणं जागीच ठार झाले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. मुंबईच्या दिशेने जाणा-या होंडा गाडीची धडक पुढे जाणा-या व्होल्वो बसला बसली. या अपघातात होंडा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हा अपघात कामशेत बोगद्याजवळ ७७ किलोमीटर अंतरावर झाला.

भगीनी देशमुख (६०) आणि श्रद्धा निलेश पाटील (१९), दत्तात्रय देशमुख (६३), राखी निलेश पाटील (३८) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रुपेश दत्तात्रय देशमुख (३४, रा. विरार मुंबई), संजय पाटील (१५), आणि एक २ वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची गंभीर परिस्थिती पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. जखमींवर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.