नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार

सामना प्रतिनिधी, नगर

नगर सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चारच्या सुमाराला स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर एक नऊ वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील रहिवासी आहेत.

रविवारी सकाळी चार वाजता नगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारामध्ये हा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर पंढरपूर येथून नेवासाकडे जात होती तर ट्रकही सोलापूरच्या दिशेने जात होता. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे.

या अपघातामध्ये रमेश कातोरे आणि द्रोपदाबाई कातोरे या दोन मृतांची ओळख पटली आहे. तर जखमी झालेल्या मुलावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.