मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, ५ जण जागीच ठार

सामना प्रतिनिधी । रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे येथे दोन ट्रकची समोरा समोर धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन ट्रकची सामोरासमोर धडक होऊन ट्रकना आग लागली. यामध्ये दोन्ही ट्रकमधील एकूण ४ जण जागीच ठार झाले. तर त्याच वेळेला मागून आलेला मोटारसायकलस्वार ट्रकला ठोकून जागीच ठार झाला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.