धाराशीव येथे दोन बसचा अपघात, ५ ठार २० जखमी

सामना ऑनलाईन । धाराशीव

धाराशीव येथील येणेगूर येथे शुक्रवारी पहाटे दोन बसचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर २० जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे आज पहाटेच्या सुमारास कर्नाटक परिवहन मंडळ आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. दोन्ही बसच्या चालकांचा मृतांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले. अपघातात २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सुरू असून अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.