तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक


सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतर्गत वादातून ही घटना घडल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तिघेही जखमी आहेत तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून, तो गंभीर आहे. इगतपुरीमधील कोपरी मोहल्ला परिसरात अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे.

दुपारच्या सुमारास कुणाल हारकरे या तरुणा बरोबर प्राशांत बोरसे, दीपक बोरसे यांचा वाद झाला होता. या वादानंतर रात्रीच्या सुमारस संशयित कुणाल हारकरे कोपरा मोहल्ला परिसरात येऊन दीपक आणि प्रशांत यांचा अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेत बाजूला थांबलेल्या बबली गुप्ता या इसमावर देखील पेट्रोल पडल्याने तोही भाजला गेला. या तिघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात प्रशांत बोरसे याची परस्तिथी गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर संशयित आरोपी कुणाल याला इगतपुरी रेल्वे स्थानकावरून पळून जात असताना इगतपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.