अच्छे दिन आता २०१९ मध्ये काँग्रेस राजवटीत दिसतील

2

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

परदेशात सुट्टी घालवून ताजेतवाने झालेल्या राहूल गांधी यांनी आल्या आल्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. दिल्लीतील जनवेदना संमेलनात मोदी सरकारच्या विविध योजनांवर टिका करतांना ते म्हणाले कि, आता अच्छे दिन मोदींच्या राज्यात नाही तर २०१९ सालात कॉंग्रेसच्या राज्यात येतील.

राहूल गांधी यांच्या टिकेनंतर भाजपने त्वरीत पलटवार केला. राहूल यांना जनतेचा कळवळा असता तर ते परदेशात गेलेच नसते. आता परदेशात जीवाची मौजमजा केल्यानंतर त्यांना हिंदुस्थानी जनता आठवली वाटते. राहूल गांधी म्हणजे पार्टटाईम नेता अशा शब्दात भाजपने टिका केली आहे.

राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

 • भाजपने देशातील प्रत्येक घटक कमजोर केला. रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नर पदाची तर थट्टाच केली.
 • गेल्या ७० वर्षात सर्व सरकारी यंत्रणा, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, न्याय प्रणाली आणि माध्यमांचा कॉंग्रेसने सन्मानच केला. मोदींनी मात्र या सर्व यंत्रणाच ठप्प केल्या.
 • नोटबंदीमुळे जगात पहिल्यांदाच हिंदुस्थानी पंतप्रधानांची खिल्ली उडवली गेली.
 • हा देश फक्त नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतच चालवतील.
 • लोकशाही विचारधारेवर हा देश चालत नाही अशी भाजप आणि संघाची धारणा आहे.
 • नोटबंदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
 • अचानक लोक गावांकडे का पळ काढताहेत, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करावा.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोडा वेळ शेतकरी आणि गरीबांसोबत घालवावा.
 • २०१९ सालात कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर खरे अच्छे दिवस येतील.
 • नोटबंदी हा एक बहाणा आहे. मोदींना मेक इंडिया आणि स्किल इंडियाचे अपयश लपवायचेय.
 • मनमोहन सिंग पंतप्रधान असतांना टिका करणारी पत्रकार मंडळी आता गप्प का?
 • मिडियामध्ये माझेही मित्र आहेत. त्यांना मला काहीतरी सांगायचेय मात्र ते प्रचंड दबावाखाली आहेत.