अभिनय क्षेत्र…

>>प्रतिनिधी<<

अभिनयसृष्टीचे ग्लॅमर सगळ्यांनाच भुरळ पाडते. त्यात प्रशिक्षण घेऊन ही झगमगती वाट अधिक सोपी होते.

पात्रता

अभिनयात करीअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘अभिनय’ ही कला विकसित करणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. शिवाय वाचन, संवाद कौशल्य याकडेही लक्ष द्यावे. व्यक्तिरेखा खुलवण्यासाठी नृत्य, संगीत या कलाही आवड असल्यास आत्मसात करण्याचा प्रयत्न जरूर करावा. अभिनय शिकवणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी १२ वी पास किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

संधी

मॉडेलिंग आणि अभिनय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सिनेमा माध्यमात बरेच कलाकार मॉडेलिंगही करतात. शिवाय निवेदक, जाहिरात, मालिका, सिनेमा अशा माध्यमांतही काम करण्याची संधी मिळते.

अभिनयात करीयर करण्यासाठी कोर्सेस

‘पीजी डिप्लोमा इन ऑक्टिंग’ हा दोन वर्षांचा कोर्स, ‘डिप्लोमा इन ऑक्टिंग’ हा तीन वर्षांचा कोर्स, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिनेमा’ हा तीन वर्षीय कोर्स आणि ‘ऑक्टिंग फास्ट ट्रक’ हा सहा महिन्यांचा कोर्स अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आखण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी होणाऱ्या कार्यशाळांमध्येही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यामध्ये भूमिका साकारण्यासाठी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. व्यक्तिरेखा उत्तम साकारण्यासाठी नाटकातही काम करू शकता.

विद्यापीठ

> फिल्म इन्स्टिटय़ूट, पुणे

> सत्यजित रे फिल्म इन्स्टिटय़ूट, कोलकाता

> नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली

> अनुपम खेर यांची ऍक्टर प्रिपेअर्स इन्स्टिटय़ूट

> सुभाष घई यांची व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल

शाळा-महाविद्यालयातील स्पर्धांमध्ये नाटक, एकांकिका स्पर्धांतून अभिनय केल्यामुळे काही जण अभिनयाच्या क्षेत्रात करीअर करण्याचा विचार करतात. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची असते. आजकाल मालिका, सिनेमा, नाटक इत्यादी माध्यमांमध्ये नवीन कलाकारांची आवश्यकता असते. अभिनयात करीअर करण्यासाठी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असून यामध्येही विद्यार्थी भविष्य घडवू जाऊ शकतात.

हल्ली होणाऱ्या नाटय़ आणि अभिनयाच्या कार्यशाळा अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मार्गदर्शन करतात. नवोदित अभिनेते, अभिनेत्री, कलाकार यामधून घडतही असतात. तरीही करीअर म्हणून अभिनयाचा मार्ग स्वीकारल्यास त्याविषयीचे प्रशिक्षण घेणेही सध्याच्या स्पर्धेच्या युगात महत्त्वाचे आहे.

अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी, निवृत्त होण्याचे कोणतेही ठराविक वय नाही. प्रेक्षकांना काम आवडल्यास भरभरून मिळालेली प्रसिद्धी आणि त्यामुळे मिळालेला पैसा या कलेचं यश आहे, मात्र त्याकरिता व्यस्त जीवन, प्रतिस्पर्धा, कधी कधी येणारे अपयश याही गोष्टी पचवण्याची तयारी ठेवावी लागते.