मुख्याधिकाऱ्याची प्लॅस्टीक विरोधी धडक कारवाई; ४ टन प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त

सामना प्रतिनिधी । उदगीर

उदगीर नगर परिषद मध्ये नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी प्लॅस्टीक वापराविरोधीत कारवाई केली. यावेळी तब्बल ४ टन प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या व ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

संपूर्ण राज्यात प्लास्टीक बंदीची घोषणा झाल्यानंतर बंदी आणलेल्या प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कार्यवाही सुरू झाली होती. त्यावेळी अनेकजणांचा माल जप्त करून दंडही नगर परिषदेने वसुल केला होता. काही दिवसानी परत प्लॅस्टीकचा वापर छुप्या पध्दतीने सुरू झाला होता. या प्लॅस्टीक कॅरीबॅगमुळे प्राण्यांना तसेच पर्यावरणाला मोठा धोका असल्यामुळे यावर बंदी होती. पण पुन्हा वापर सुरू झाल्याचे निर्दशनास आल्यावर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी कारवाई करीत ४ टन कॅरीबॅग, ६ तराजु व ७० हजार रुपयाचा दंड वसुल केल्यामुळे अनेकजणांचे धाबे दणाणले आहेत.