वरळीतील राष्ट्रवादी व मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सामना ऑनलाईन । मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व आमदार सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळीतील राष्ट्रवादी व मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. सरचिटणीस विलास शिरावळे, वरळी उपतालुका अध्यक्ष संभाजी शेलार, वॉर्ड सरचिटणीस संतोषी सुनील शिरोडकर, सक्रिय सभासद अयुब खान, शब्बीर खान, सोनी कौल तसेच मनसेचे माजी उपविभागप्रमुख व आंध्र महासभेचे अध्यक्ष रमेश मंथेना आणि मनसे लॉटरी विक्रेता सेनेचे उपाध्यक्ष ब्रिजेश शर्मा, संतोष शर्मा, अमरनाथ दुबे, अजय पंडित, सत्यम हंडा, प्रकाश चव्हाण यांचा समावेश आहे.