Video- महाराष्ट्राची कदर करणं बाळासाहेबांनीच शिकवलं- जॅकी श्रॉफ

jackie-shroff-met-balasaheb

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राची कदर करणं बाळासाहेबांनीच शिकवलं. जिथे जन्म घेता, राहता, खाता, त्याची कदर करणं हे बाळासाहेबांनीच शिकवंल, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी साहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुखांचे हृदय हे वडिलांसारखे होते. ते मला मुलाप्रमाणे वागवायचे, अगदी वडिलांचे प्रेम द्याचे, म्हणून मी त्यांना बाबाचं मानतो, असेही ते म्हणाले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेला आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील भव्य चित्रपट ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने जॅक श्रॉफ यांनी आपल्या भावना अगदी मोजक्यापण सरळ शब्दात मांडल्या. शिवसेनाप्रमुख त्यांना जसे दिसले, भावले ते आपल्या शब्दात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पाहा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जॅकी श्रॉफ आणखी काय म्हणाले…