अनुष्काचा विराटसोबत ‘कॉफी …’ला जाण्यास नकार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा लग्नाआधीपासून सुरू आहे. फिल्म इंडस्टीमध्ये त्यांना परफेक्ट कपल मानले जाते. लग्नानंतर दोघंही आपापल्या कामामध्ये व्यस्त झाली आहेत आणि त्याचमुळे अनुष्काने विराटसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना करणच्या स्पेशल शोमध्ये विरुष्काची जोडी पाहण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तर अनुष्का शर्मा तिच्या पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या परी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे करणच्या चॅट शोमध्ये जाण्यासाठी दोघांनाही वेळ नाही. लग्नानंतर या जोडीला शोमध्ये बोलावून टीआरपी वाढवण्याची संधी सध्यातरी करणच्या हातातून गेल्याचं दिसत आहे. मात्र अनुष्काची सेक्रेटरीने प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याना निव्वळ अफवा असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या परी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये अनुष्काचा भयानक अवतार पाहायला मिळत आहे. अनुष्काचा हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार आहे.