जिवलग मित्र

माझा जोडीदार हा माझा जिवलग मित्र आहे. ते माझे आधारस्तंभ आहेत. ‘सहजीवनी या…’ सदरात सांगताहेत ज्येष्ट अभिनेत्री इला भाटे

तुमचा जोडीदार
– डॉ. उदय भाटे

लग्नाचा वाढदिवस
– १४ जून १९७८

आठवणीतला क्षण
– आमची मुलगी ऋचा हिला अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेले सुवर्णपदक

त्यांचे दोन शब्दात कौतुक
– शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष

त्यांचा आवडता पदार्थ
– बासुंदी, साधी डाळ मेथी आणि गरम पोळी

स्वभावाचे वैशिष्टय़
– कोणालाही पटकन आपलसं करून घेतात.

एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ
– चहा छान करतात आणि मुगाची खिचडी बनवायची ते शिकणार आहेत.

वैतागतात तेव्हा…
– एकदम शांत राहते. पूर्वी त्यांना बोलते करण्यासाठी प्रयत्न करायचे, पण आता राग शांत होण्याची वाट पाहते.

त्यांच्यातली कला
– खेळाची आवड, त्यांना गप्पा मारायला आवडतात, शिवाय ते उत्तम रसिक आहेत. चांगल्या कलेचे कौतुक करतात.

त्यांची गंमत करायची असल्यास
– खरं तर तेच माझी गंमत करतात. एखाद्या चित्रपट, नाटकासाठी जायचे असेल तर घरी येऊन गंभीरपणे सांगतात की, तिकीटच मिळाली नाही आणि नंतर अचानक सरप्राईज देतात. मला गंमत करण्याची संधीच देत नाहीत.

त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ
– शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले…

तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान
– आधारस्तंभ

भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल
– मी, माझे मिस्टर आणि ऋचा तिघांनी देश-परदेशात केलेल्या पिकनिक, तिथे निश्चिंत वातावरणात आनंदी समाधानी दिवस घालवले ते प्रवासातले दिवस.

तुम्हाला जोडणारा भावबंध
– अर्थात आमची मुलगी ऋचा आणि एकमेकांविषयीचा जिव्हाळा-काळजी.

कठीण प्रसंगात त्यांची साथ
– नेहमीच. अतिशय सकारात्मक बोलतात. त्यांच्याशी बोलल्यावर भिती, काळजी निघून जाते अशा पद्धतीचे विश्वास देणारे बोलणे आणि वागणे असते.

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट
– मी माझ्या भावना वेळोवेळी व्यक्त करत आले. मी शब्दांवर विश्वास ठेवणारी आहे. पण असं काही असतं की, काही गोष्टी सांगता येत नाहीत त्यासाठी मी ही संधी घेऊन सांगेन की माणूस, म्हणून डॉक्टर म्हणून उदय माझ्या आयुष्यात तुझे मानाचे स्थान आहे आणि नवऱयापेक्षा मित्र म्हणून तू मला जास्त आवडतोस. कायम माझा जिवलग मित्र राहा असेच सांगेन.