अभिनेत्री ‘एलियाना डिक्रूझ’चा गौप्यस्फोट!

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रूझने ट्विटरद्वारे एक खुलासा केला आहे. अलिकडेच एलियाना डिक्रूझसोबत एका चाहत्याने गैरवर्तन केल्याचे ट्विटवरुन तिने सांगितले आहे. तिने लागोपाठ दोन ट्विट केले आहेत. मी भलेहीसेलिब्रिटी आहे, पण शेवटी एक स्त्री आहे, असं आपल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलं आहे. पण ही घटना तिच्यासोबत कधी आणि कुठे झाली याबद्दल तिने काहीही माहिती दिलेली नाही.

एलियानाने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणते, मला माहित आहे की आपण एका खराब जगात जगतोय, मला हे ही माहित आहे की मी एक सेलिब्रिटी आहे, मी खाजगी आयुष्य जगू शकत नाही. लगेच दुसरं ट्विट करत तिनं पुढे म्हटलंय की, याचा अर्थ असा नाही की कोणत्याही व्यक्तीला माझ्यासोबत गैरवर्तन करण्याची परवानगी आहे.

छेडछाडी विरुद्ध उभं राहिल्याची ही तिची पहिलीच वेळ नसून याआधीही एलियानाने ट्विटर माध्यमातून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या काही दिवसांमध्ये देश आणि जगातील अनेक मोठी व्यक्तिमत्व शारीरिक शोषण आणि छळ याबद्दलचे त्यांचे अनुभव शेअर करत होते तेव्हा एलियानाने त्या मुलीचे ट्विटरवरुन कौतुक केले जिने आपल्या माजी प्रियकराच्या मेसेजचा सर्वांसमोर खुलासा केला होता. त्यावेळी एलियानानेही तिच्यासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणाचा त्रासदायक अनुभवही शेअर केला.

सध्या एलियाना डिक्रूझ तिचा आगामी चित्रपट ‘बादशाहो’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘बादशाहो’ या चित्रपटात अजय देवगण, एलियाना डिक्रूझ प्रमुख भूमिकेत आहेत. या जोडीसोबतच इमरान हाश्मी, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे देखील चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.