Faशन Paशन


केतकी माटेगावकर

टॅटूतून व्यक्तिमत्त्व कळतं…

फॅशनची व्याख्या…फॅशन म्हणजे केवळ कपडे नाही तर फॅशन म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस? मला जितके कम्फर्टेबल कपडे घालता येतील तेवढे घालते. दिसण्यापेक्षा कम्फर्ट झोन जास्त महत्त्वाचा मानते. ते कपडे फॅशनमध्ये असोत किंवा नसोत.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? फॅशन म्हणजे केवळ कपडे नाही तर तुमचे व्यक्तिमत्त्व, तुम्ही ते कसे कॅरी करता तेही महत्त्वाचे असते.

आवडती हेअर स्टाईल? मूडवर अवलंबून असते.

फॅशन जुनी की नवी? मला जुनी नवी कुठलीच फॉलो करायला आवडत नाही. मला ती स्वतःची क्रिएट करायला आवडते.

आवडता रंग? पांढरा

तुमच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते..माझ्या आई-बाबांना मी हिंदुस्थानी पेहरावात जास्त आवडते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? हो. जिथे फॅशन चांगली तिथे कपडे घेते मग तो मॉल असो किंवा स्ट्रीट. मी कपडय़ांच्या बाबतीत चिकित्सक आहे. त्यामुळे शो, कन्सर्टचे शो डिझायनर्सकडून घेते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? मी कपडय़ांपेक्षा चपला, शूजवर जास्त खर्च करते.

ज्वेलरीमध्ये काय आवडते? घडय़ाळं आणि बाबांनी नुकतीच घेतलेली डायमंड रिंग.

आवडता ब्रॅण्ड…बेरमूडा आणि फॉरेव्हर २१

फॅशन फॉलो कशी करतेस? पिंट्रेस्ट. मी माझ्यापेक्षा माझ्या डिझायनरला सांगून ठेवलय पिंट्रेस्ट बघत जा. तसेच माझी आई माझ्यासाठी जे कपडे घेते ते मला जास्त आवडतात.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? फॅशनमध्ये नवीन काय काय येते हे मला नक्कीच माहित असते, पण ते मी फॉलो करतेच असे नाही. फॅशनमध्ये नसतात त्याच गोष्टी फॉलो करते.

ब्युटी सिक्रेट…माझी आई

टॅटू काढायला आवडेल का? मी तीन काढले आहेत. टॅटू अशी गोष्ट आहे ज्यातून तुमचे व्यक्तिमत्त्व कळायला हवे. दोन टॅटू संगीताशी रिलेटेड आहेत.

तुझ्या बॅगेत आढळणाऱया तीन गोष्टी…लिपबाम, परफ्युम, स्पॅअर घडय़ाळ.

फिटनेससाठी…कुठल्याही गोष्टीचा अतिआनंद आणि अतिदुःख करत बसू नका. भावनांवर नियंत्रण असावे. मी नियमित वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करते.