दाक्षिणात्य चव…मयुरी वाघला काय आवडते खायला


मयुरी वाघ तिला आईच्या हातचं काहीही आवडतं. चाट आणि दाक्षिणात्य पदार्थही तिच्या जास्त आवडीचे आहेत. डाएट करते, पण आठवडय़ातून एकदा मनसोक्त खाते.

खाणंया शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ?  – माझ्यासाठी खाणं म्हणजे ‘पोट भरणं’

खायला काय आवडतं ?  – आईच्या हातचं काहीही आवडतं. चाट आणि दाक्षिणात्य पदार्थ जास्त आवडतात.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? –  घरचं खाते आणि भरपूर पाणी पिते.

डाएट करता का ?  –  हो, तरीही आठवडय़ातून एकदा ‘चिट मिल’ घेते.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? – बाहेर खाणं बऱ्याचदा टाळते. जे हवं ते घरीच बनवते, पण कामानिमित्त कधी कधी बाहेर खावंच लागतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – वर्सोव्यातलं बनाना लिफ आणि पुण्यात नागब्रह्म.

कोणतं पेय आवडतं ? – कॉफी प्रचंड आवडते.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता  ? – प्रयोगावेळी घरून डबा नेते. त्यासोबत सुकामेवा, राजगिरा चिक्की असा सुक्या खाऊचा डबाही सोबत असतोच.

स्ट्रीट फूड आवडतं का ? –  हो खूप आवडतं. पण डाएटमुळे त्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणून आठवडय़ातून एकदा चिट डे असता. तेव्हा खात.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? –  घरचं सगळंच खायला आवडतं.

घरी आलेल्या पाहुण्यांना आवर्जून काय खाऊ घालता ? –  वरण भात, वांग्याचं भरीत, डाळिंबी उसळ.

उपवास करता का ? –  हो. दर गुरुवारी आणि नवरात्रीतले नऊ दिवस उपास करते.