मिनिषा लांबा पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई

हल्ली मोठ्या पडद्यावरच्या बड्या कलाकारांना छोट्या पडद्यावर देखील चांगलीच प्रसिद्धी मिळतेय. त्यामुळे अनेक अभिनेते अभिनेत्री छोट्या पडद्यावर त्यांचे लक आजमवताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री मिनिषा लांबा देखील पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरच्या मालिकेत झळकणार आहे. कलर्स वाहिनीवरील ‘इंटरनेट वाला लव्ह’ या मालिकेत मिनिषा लांबा झळकणार आहे.

internet-wala-love

‘इंटरनेट वाला लव्ह’ ही या मालिकेत मिनिषा मुख्य भूमिकेत दिसणार नसली तरी तिची एक महत्त्वाची भूमिका आहे. ही मालिका येत्या २७ ऑगस्ट पासून सुरू होणार असून सोम. ते शुक्र. सायं ७ वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत तनिषा शर्मा आणि शिवीन नारंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.