प्रीतम कागणे दिसणार डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत

आगामी ‘अहिल्या’ या चित्रपटात अभिनेत्र प्रीतम कागणे दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येईल. या भूमिकेसाठी प्रीतमने बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचे खडतर पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे. या चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परुळेकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.