कोणत्याही कामात देव पाहते – सुहिता थत्ते

ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते यांचा कर्मयोगावर विश्वास आहे.

> देव म्हणजे? – ऊर्जा

> आवडते दैवत? – निसर्ग

> धार्मिक स्थळ? – मी मूर्तिपूजा करत नाही.

> आवडती प्रार्थना – निसर्गाच्या सान्निध्यात असताना मला कृतज्ञता व्यक्त करायला आवडते.

> आवडतं देवाचं गाणं? – अल्ला तेरो नाम…आणि हृषिकेश, हरिद्वारला घाटावर संध्याकाळी गंगेची आरती होते. त्यामुळे मला भावुक व्हायला होतं. अतिशय हृदयस्पर्शी असते.

> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – भगवद्गीता, ज्ञानेश्वरीचं निरुपण

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – दैवी चमत्कार म्हणून विश्वास नाही, पण शक्ती म्हणून विश्वास आहे.

> आवडता रंग? – सगळे रंग आवडतात.

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – कोणत्याही गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की मला समाधान मिळतं.

> देवावर किती विश्वास आहे? – विश्वास आहे. किती आहे ते नाही सांगू शकत.

> दुःखी असता तेव्हा? – ध्यानधारणा (मेडिटेशन) करते.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल? – मला त्यांच्याबद्दल आदर आहे. प्रत्येकाला आपापले श्रद्धास्थान मानण्याचा किंवा न मानण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणी कुणावर जबरदस्ती करू नये. प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळायला हवं. दुसऱ्याचं स्वातंत्र्य जपावं.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय?- भक्ती स्वतःपुरती करावी समाजावर त्याची जबरदस्ती करू नये. देवभोळंही असावं पण स्वतःपुरतं असावं. मी पूजा करते म्हणून इतरांनीही करावी, असं करू नये.

> इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? – नाही.

> ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे? – शास्त्र असेलही मला ते कळत नाही.

> उपवास करता का – डाएटचा भाग असेल तर करते. नाहीतर नाही करत.

> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? माझ्या कामावर माझी भक्ती आहे. मग ते अभिनय, स्वयंपाक, केर काढणे किंवा कोणतंही असेल

> मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – प्रार्थना