अभिनेत्री अदिती देशपांडेचे हिंदी मालिकेत पदार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री अदिती देशपांडे या आता हिंदी मालिकेमध्ये पदार्पण करणार आहेत. अदिती या लवकरच सोनी वाहिनीवरील ‘मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ या मालिकेत झळकणार आहे.

या मालिकेत अदिती या सासूच्या म्हणजेच रमाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रमा ही एक प्रेमळ सासू असून ती तिच्या सुनेला खूप चांगली समजून घेते असे दाखविण्यात आले आहे. ‘मी या भूमिकेसाठी खूप उत्साही असून ही आतापर्यंतची मी साकारलेली सर्वात वेगळी भूमिका आहे.’ असे अदिती सांगते. ही मालिका येत्या ११ सप्टेंबर पासून सुरू होणार असून ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.