कंगनाने आदित्यचे ३० लाख हडपले?

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉलीवूड क्वीन कंगना राणौत हिने अलीकडेच टीव्हीवरील एका कार्यक्रमात हृतिक रोशन, अध्ययन सुमन आणि आदित्य पांचोली यांच्यावर धक्कादायक आरोप केले. तिने केलेल्या आरोपांचा पलटवार आता आदित्य पांचोलीने केला आहे. कंगनाने ३० लाख रुपये हडपल्याने आदित्यने म्हटले आहे. कंगनाने घर खरेदी करण्यासाठी माझ्याकडे एक कोटी मागितले होते. त्यावेळी एवढी रक्कम माझ्याकडे नव्हती. मी तिला ५५ लाख रुपये रोकड दिली. तिच्या बहिणीच्या प्लास्टिक सर्जरीवरही दहा लाख रुपये खर्च केले. जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा तिने केवळ २५ लाख रुपये परत केले.  उरलेली रक्कम हडपली, असे आदित्य यांनी सांगितले आहे.