आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना युवासेना आणि शिवसेनेकडून खिचडी वाटप करण्यात आले. राजापूरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, फळवाटपाबरोबरच वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला.

जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बुधवारपासून युवासेनेच्या वतीने खिचडी वाटप करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक रवींद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदिप साळवी, नगराध्यक्ष राहूल पंडीत, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, उपजिल्हा संघटक ममता जोशी, तालुका संघटक कांचन नागवेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हा शल्य चिकिंत्सक डॉ.प्रल्हाद देवकर, डॉ.दिलीप मोरे, युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, उपतालुका युवाधिकारी देवदत्त पेंडसे, महिला हरप्रमुख मनिषा बामणे, नगरसेवक निमेश नायर, सुहेल मुकादम, संतोष कीर, श्रध्दा हळदणकर, मीरा पिलणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ratnagiri-aditya-1

लांजा-राजापूर-साखरपामध्ये विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून शिवसेना व युवासेना लांजा तालुका आणि शहरच्या वतीने महिलाश्रम लांजा येथे शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊवाटप करण्यात आले. महिला आश्रमातील दहावीच्या विद्यार्थीनींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजापूर शिवसेना व युवासेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे फळवाटप करण्यात आले. साखरपा विभागाच्या वतीने विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने यांच्या मार्गर्दनाखाली शिवसेना व युवासेनेच्या वतीने प्राथमिक आरोग्यकेंद्र साखरपा येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच १० हजार १ फळझाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याची सुरुवात निनावे या आंबा घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गसंपन्न गावापासून करण्यात आली.

यावेळी लांजा तालुक्याचे उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, तालुकाप्रमुख संदिप दळवी, पंचायत समिती सभापती युगंधरा हांदे, युवासेना शहरप्रमुख राहूल शिंदे, नंदराज लल्ल्या, उपतालुका युवाधिकारी बापू लांजेकर, विभाग प्रमुख सुरेश करंबेळे, स्वरुपा साळवी, पुजा नामे, माजी सभापती दिपाली दळवी, लिला घाडी, नागेश, राजापूर तालुक्यातील तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, महिला आघाडी प्रमुख योगिता साळवी, संतोष हातणकर, प्रफुल्ल लांजेकर, मंदा विलकऱ साखरपा विभागातील विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, उपसरपंच अजय सावंत, मंगेश दळवी, नाना सुर्वे, युवासैनिक, कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या