…तर पाकिस्तानच्या अणुभट्ट्य़ा उडवू!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरकारने पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केलाच तर पाकिस्तानच्या अणुभट्ट्य़ा उडवून देऊ, असा सज्जड दम वायुदलप्रमुख अॅडमिरल बी. एस. धनोआ यांनी भरला आहे. भूदल आणि नौदलही आम्हाला मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युद्ध होणारच नाही, पण झालेच तर चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्य़ांवर लढण्याची क्षमता वायुदलात असेही ते म्हणाले.

८ ऑक्टोबर रोजी वायुदल दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ऍडमिरल बी. एस. धनोआ बोलत होते. सीमेवरील सध्याचे वातावरण पाहता दोन आघाड्य़ांवर युद्ध होण्याची शक्यता अतिशय धुसर आहे, परंतु असे युद्ध झालेच तर चीन व पाकिस्तानशी दोन हात करण्याची क्षमता आमच्या वायुदलात आहे, असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. चीनचे सैन्य सध्या चुंबा घाटात सराव करत आहे. सराव संपल्यानंतर हे सैन्य पुन्हा माघारी फिरेल, असेही ते म्हणाले.