ऐरोनॉटीकल इंजिनिअर तरुणी बनली सरपंच

सुधीर नागापुरे । बीड

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील तरुणी सर्वात कमी वय असलेली सरपंच ठरली आहे. ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर असे या सरपंच झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला आहे.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावात सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असताना देखील निवडणूक लढवून ऋतुजाने विजय मिळवला. ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाला गावाचा विकास करायचा आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.