राजाला पत्नी निवडता यावी म्हणून टॉपलेस तरुणींची परेड

699

सामना ऑनलाईन। लोबांमा

आफ्रीका खंडातील स्वाझिलँड (आताचे नाव ईस्वातिनी) या देशात सध्या एका परेडची जोरदार चर्चा सुरू आहे. पण हे परेड लष्कराचे नसून अर्धनग्न तरुणींचे आहे. येथील राजा सेंतनी मस्वाती मसान्गोला (37) 14 बायका आहेत. पण आता राजाला पंधरावे लग्न करायचे असल्याने या परेडमधील सर्वात आकर्षक तरुणीची पत्नी म्हणून तो निवड करणार आहे. सप्टेंबरमध्ये हा लग्न सोहळा संपन्न होणार आहे.

raja-girl

विशेष म्हणजे स्वाझिलँडमध्ये सामान्य पुरुषांना बहुपत्नीत्वास परवानगी नाही. पण राजाला मात्र बहुपत्नीत्वास मान्यता आहे. तशी येथे प्रथाच आहे. या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये येथे अर्धनग्न तरुणींची एक परेड ठेवली जाते. यातील एका तरुणीची निवड राजा पत्नी म्हणून करतो. सध्याचा राजा मस्वती-3 याला 14 बायका असून 25 हून अधिक मुलं आहेत. याआधी त्याला 15 राण्या होत्या.raja-1पण गेल्या वर्षी यातील एका राणीचे निधन झाले. यामुळे यावर्षी राजा नवीन

वधूच्या शोधात आहे. याचपार्श्वभूमीवर जिलँड य़ेथे सप्टेंबरमध्ये गावातील व गावाबाहेरील तरुणी या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्यावर्षी या परेडमध्ये 40 हजार तरुणींनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, या परेडमध्ये नाईलाजाने जावे लागते. नाहीतर मुलीच्या पालकांना दंड आकारला जातो. असे काहीजणांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या