996 नंतर जॅक मा यांनी दिला सेक्सचा 669 फॉर्म्यूला

2

सामना ऑनलाईन । बीजिंग

अलीबाबा या कंपनीचे संस्थापक जॅक मा हे नेहमीच त्यांच्या धोरणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीही त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी लोकांना 996 फॉर्म्यूला वापरण्याचा सल्ला दिला होता. पण आता त्यांनी थेट लोकांच्या बेडरुममध्ये उडी मारली असून समाधानी सेक्सलाईफ हवं असेल तर 669 फॉम्युला वापरा असा अनोखा सल्ला दिला आहे. सेक्सवरच्या त्यांच्या या सल्ल्याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. तर काहीजणांना जॅक मा यांची ही आयडीया भन्नाट वाटली आहे.

जॅक मा यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 996 फॉर्म्युला वापरण्याचा सल्ला दिला होता. याचा अर्थ सकाळी 9 ते रात्री 9 अशा पद्धतीने आठवड्यातील सहा दिवस काम करण्यास जॅक मा यांनी तरुणांना सांगितले . पण आता त्यांनी समाधानी सेक्ससाठी आठवड्यातील सहा दिवस ,सहावेळा सेक्स करण्याचा सल्ला दिला. डेली मेलने हे वृत्त दिले आहे. एका सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जॅक मा यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नवविवाहीतांना 669 सल्ला देऊन धम्माल उडवून टाकली. जॅक मा दरवर्षी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करतात.यावेळी 10 मे रोजी हा सोहळा होता. त्यावेळी बोलताना त्यांनी 669 बद्दल सांगितले.

दरम्यान जॅक मा यांच्या 669 फॉरम्युल्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर 669 केल्यानंतर 996 करणे कसे जमणार असा सवाल केला. तर काहीजणांनी 669 सल्ला दिल्याबद्दल जॅक मा चे आभार मानले आहेत.