चांद्रयान-2 मोहिमेनंतर इस्रोचे लक्ष शुक्र आणि सूर्याकडे

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चांद्रयान 2 मोहीम 15 जुलैला लाँच करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेनंतर इस्रोचे लक्ष आता शुक्र आणि सूर्याकडे आहे. चांद्रयान महिमेबाबत इस्रो आणि सरकारकडून एकत्रित माहिती देण्यात आली. चांद्रयान 2 मोहिमेसाठी 10 हजार कोटींचा खर्च होणार आहे. गेल्या काही वर्षात अवकाश संशोधन क्षेत्रात हिंदुस्थानने अनेक विक्रम केले आहेत, आता चांद्रयान 2 ही महत्वाकांक्षी मोहीम लवकरच लाँच होणार आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. यावेळी इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी इस्रोच्या आगामी काळातील मोहिमांबाबत माहिती दिली. चांद्रयान 2 मोहिमेनंतर इस्रो शुक्र आणि सूर्यापर्यंत पोहचण्यासाठी महत्वाच्या मोहीमा आखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याबाबतच्या कामांना सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.

<

शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ‘मिशन व्हिनस’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम 2023 पर्यंत पूर्ण होईल. तसेच सूर्याचा आणि त्याच्या कक्षेचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवण्यात येणार आहे. त्याची तयारीही सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अंतराळ संशोधनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हेतू असल्याचे सिवन यांनी सांगितले. चांद्रयान 2 मोहीम 15 जुलैला 2 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेत 2-3 क्रू सदस्य असतील. त्यांचे संपूर्ण प्रशिक्षण हिंदुस्थानातच झाले आहे. तसेच हिंदुस्थानचे पहिले मानवासह अंतराळयान अवकाशात पाठवण्याची मोहीम 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. चांद्रयान 2 मोहीमेत एक रोवरही पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम म्हणजे चांद्रयान 1 चे विस्तारीत स्वरूप असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

सूर्याचा आणि त्याच्या कक्षेचा अभ्यास करण्यासाठी इस्रो मिशन सन हाती घेणार आहे. या मोहीमेत सूर्याच्या लिबरेशन पाँइट वनचा अभ्यास करण्यासाठी एक उपग्रह पाठवण्याची योजना आहे. अशा प्रकरच्या मोहीमा हाती घेऊन अतंराळ संशोधन विज्ञानातील महाशक्ती बनण्याचे उद्दीष्ठ असल्याचे सिवन यांनी सांगितले. मिशन गगनयान 2021 पर्यत पूर्ण होणार आहे. या मोहिमेत इस्रो पहिल्यांदाच हिंदुस्थानात बनवण्यात आलेले रॉकेट अंतराळात सोडणार आहे. याबाबतचे प्राथमिक प्रशिक्षण देशातच होणार असून पुढील प्रशिक्षण परदेशात होणार आहे. तर शुक्राचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली मिशन व्हिनस 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. गेल्या काही वर्षात तापमानवाढीच्या समस्येने उग्र रुप धारण केले आहे. या समस्येचा तोडगा काढण्यावरही इस्रो काम करत असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या