‘या’ अभिनेत्रींना घातला मोदीने गंडा…

सामना ऑनलाईन । मुंबई

पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारा डायमंड किंग नीरव मोदी आणि त्याचा नातलग मेहुल चोक्सीच्या रोज नव्या सुरस कथा बाहेर येत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर आता कंगना रानौट आणि बिपाशा बासूनेही मेहुल चोक्सीच्या गितांजलीवर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला कराराचे पैसे मिळाले नाहीत, तसेच करारामधील अटीही पायदळी तुडवण्यात आल्या अशी तक्रार या अभिनेत्रींनी केली आहे. त्यामुळे आता प्रियांका पाठोपाठ कंगना आणि बिपाशाचीही या महाठगांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नीरव मोदीने मलाही फसवले – प्रियंका चोप्रा

कंगनाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ गितांजली या प्रतिष्ठित ब्रँडच्या नक्षत्र च्या काही दागिन्यांचे प्रमोशन कंगानाने केले होते. या प्रमोशनचा कंगनाला अजूनही मोबदला मिळालेला नाही. तर नक्षत्रसोबतचा प्रसिद्धी करार संपल्यानंतरही फोटोचा वापर करुन विविध जाहीराती छापण्यात आल्या, अशी तक्रार बिपाशाने केलीय.

आता पगार देणे जमणार नाही; दुसरी नोकरी शोधा, नीरव मोदीचा निर्लज्जपणा

नीरव मोदी ने २०१० मध्ये नीरव मोदी डायमंड्स या नावाने दागिन्यांच्या दुकानांची साखळी सुरु केली होती. हिंदुस्थानात दिल्ली आणि मुंबईमध्ये त्याची दुकाने आहेत तर लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग अशा जगभरातील १६ शहरात त्यांची हिऱ्यांच्या दागिन्यांची दुकाने आहेत. नीरवने डिझाईन केलेले दागिने केट विन्स्लेट, नाओमी वॉटस, कोको रोशा, लिसा हेडन आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टाईल आयकॉन घालतात. त्यामुळे या ब्रँडची सेलिब्रिटी ब्रँड अशी ओळख आहे.

  • rahul

    नाव लिहा की पूर्ण….। आम्हाला वाटते की नरेंद्र मोदींनी गंडा घातला

  • Ashish Patole

    SAMANA grow up.. you are also on chair with BJP.. at least have courage to accept mistake regarding NIRAV MODI scandle.. SAMANA has not left any chance to HUMILIATE P.M. Modiji..
    YOU BOTH BJP AND SHIVSENA ARE RESPONSIBLE FOR THIS SCAM as this is happen in our MUMBAI and UNDER YOURS PARTYs are at chair.