पापाचा घडा भरला! सोनसाखळी चोर नवऱयाची पत्नीने दिली टीप

2

सामना ऑनलाइन , टिटवाळा

सात वर्षे वारंवार पोलीस पथकांना गुंगारा देणाऱया मोस्ट वॉन्टेड पुख्यात सोनसाखळी गुलाम ऊर्फ अब्बास इराणी ऊर्फ जाफरी याला पत्नीने दिलेल्या ‘टीप’नंतर पोलिसांनी उचलले. आंबिवलीच्या इराणी वस्तीतून पोलिसांनी त्याला अटक केली असून चारवेळा मोक्का लागलेल्या जाफरीच्या अटकेने अनेक सोनसाखळी चोऱया उघड होणार आहेत.

टिटवाळा येथील आंबिवलीच्या इराणी वस्तीमध्ये जाफरी राहात होता. काही दिवसांपूर्वी पत्नीसह सासूला मारहाण करून त्याने पळ काढला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. मात्र पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होतीच. त्याच्यावर एपूण 22 गुन्हे बाजारपेठ, नारपोली, वागळे इस्टेट, वर्तकनगर यांसह इतर पोलीस ठाण्यात दाखल होते. मात्र पोलिसांची पुणपुण लागताच तो पसार होत असे. अखेर सात वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱया जाफरीबाबत पत्नीनेच पोलिसांना माहिती दिली.