पोलिसाची मालीश करतानाचा महिला होमगार्डचा व्हिडिओ व्हायरल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हैद्राबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा महिला होमगार्डकडून मालीश करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमध्ये खाकी साडीमध्ये ड्युटीवर असलेली महिला होमगार्ड आरामात झोपलेल्या पोलीस अधिकाऱ्याची मालीश करत असताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओमधील पोलीस अधिकारी गढवाल पोलीस स्टेशनमधील असिस्टंट सब इस्फेक्टर हसन असल्याचे उघड झाले आहे.

याआधीही हैद्राबादमधील अशीच एक घटना समोर आली होती. यात एक पोलिसाच्या गणवेशातील अधिकारी पुरुष होमगार्डकडून मालीश करताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी व्हिडिओतील पोलीस अधिकारी एस. लिंगायत आणि होमगार्ड सदा नाईक असल्याचा दावा केला होता. मात्र पोलीस अधिकारी लिंगायत यांनी त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हणत आपण कोणत्याही होमगार्डला खासगी कामासाठी नियुक्त केले नसल्याचे म्हटले होते.