अमरावतीमध्ये कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन

1

सामना ऑनलाईन , अमरावती

राज्य शासनाने मृद व जलसंधारण विभाग नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाकरता कृषी विभागातील जवळपास १० हजार पदं कायमस्वरूपी वर्ग करण्याची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागातच अनेक पदं रिक्त असताना या नव्या विभागासाठी ही पदं वर्ग करण्याला कृषी सहायक संघटनेने विरोध दर्शविला आहे. या मागणीसाठी आज राज्यभरातील विभागीय कृषी अधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी विभागातील रिक्त पदं भरण्याऐवजी ३० ते ४० टक्के पदं नव्या विभागात वर्ग करणे अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

  • या आंदोलनकर्त्यांच्या अन्य प्रमुख मागण्या अशा प्रकारे आहेत
  • कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा
  • सुधारित आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी असे करण्यात यावे
  • कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी