राजगड स्टड फर्मचा ‘अलबक्श’ ठरला देशात प्रथम

1

सामना प्रतिनिधी। नगर

केडगाव येथील राजेश सातपुते यांच्या राजगड स्टड फर्मचा अलबक्श या अश्‍वाने भारतात पहिला येण्याचा बहुमान पटकाविला आहे. नुकतेच ऑल इंडिया मारवारी हॉर्स असोसिएशनच्या वतीने 2019 मारवार हॉर्स शो चे आयोजन जोधपूर (राजस्थान) येथे करण्यात आले होते. यामध्ये दो दंत विभागात अलबक्श प्रथम आला आहे.

राष्ट्रीय स्तरावर अश्‍व प्रेमींसाठी या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. या स्पर्धेत अश्‍वाची चाल, राहणीमान, शरीरयष्टी, बौध्दिकक्षमता आदि विविध गुणाची पहाणी परिक्षक करीत असतात. यापूर्वीदेखील 2017 मध्ये राजेश सातपुते यांचा ऑस्कर या अश्‍वाने भारतात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला होता. सातपुते यांना अश्‍वाची आवड असून, त्यांच्या राजगड स्टड फर्ममध्ये भारतात प्रथम आलेले दोन अश्‍व आहे. महाराष्ट्रात प्रथमच दोन्ही अश्‍वांनी देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. या अश्‍वांना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत असतात.

केडगाव येथील राजेश सातपुते यांच्या राजगड स्टड फर्मचा अलबक्श या अश्‍वाने जोधपूर (राजस्थान) येथे झालेल्या 2019 मारवार हॉर्स शो मध्ये भारतात पहिला येण्याचा बहुमान पटकाविला.