नगरच्या डॉन बॉस्को शाळेच्या बसला अपघात, अनेक विद्यार्थी जखमी

220

सामना प्रतिनिधी । पुणे

नगर जिल्ह्यातील डॉन बॉस्को शाळेची सहल मुंबईला निघाली होती. तेव्हा ओतुरमधील आळेफाटा पासून दहा किलोमीटर अंतरावर गायमुखवाडी याठिकाणी गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील 40 मुलांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना मार लागलेला आहे नेमका अपघात कशामुळे झाला काय झाला हे समजू शकलेले नाही. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या