महानगरपालिका निवडणूक! प्रभाग 14 मध्ये पैसे वाटप करताना एक ताब्यात

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मतदारांना पैसे वाटप करत असताना उदय भोसले याला पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्या विरुध्द येथील कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरमाध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये गुरुवारी सकाळी एका उमेदवाराचे पैसे वाटप करत असताना उदय भोसले (रा.भासेले आखाडा) याला रंगेहात पकडले. त्याच्या जवळ 37 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. यामध्ये 2 हजार व 500 च्या नोटांचा समावेश आहे. या प्रकारामुळे या परिसरात चांगलेच वातावरण तंग झाले होते.

भोसले याला कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले होते व त्याची चौकशी केली होती. या प्रकरणी राजेंद्र अंधळे मंडलाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.नागवे हे करीत आहेत. दरम्यान, हे पैसे तो कोणासाठी व कोणाचे वाटत होता हे फिर्यादीने नमूद केले नसल्याने या प्रकाणाला कितीपत अर्थ राहणार आणि पुढे याचा कसा तपास होणार हे गुलदस्यातच आहे.