भाजपला दक्षिणेत मिळाला नवा मित्र, आज युतीची घोषणा होण्याची शक्यता

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दक्षिणेकडील राज्यात हातपाय पसरण्यासाठी गेली अनेक वर्ष धडपड करत असलेल्या भाजपला एक दिलासा मिळाला आहे. तमिळनाडूमधल्या एका मोठ्या पक्षाने भाजपसोबत युती करण्याचे निश्चित केले असून त्याची औपचारीक घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

दिवंगत नेत्या जयललिता यांचा पक्ष असलेल्या एआयएडीएमकेने  ( AIDMK )भाजपसोबत युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तमिळनाडूमध्ये हा पक्ष सध्या सत्तेत असून त्यांच्यासोबत पीएमके आणि डीएमडीके या पक्षांनाही एआयएडीएमके आणि भाजपने सोबत घेण्याचं ठरवलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा युतीबाबतची घोषणा आज करण्याची शक्यता आहे.

तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत. यापैकी एआयएडीएमके 25 जागांवर तर भाजप 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या राज्यामध्ये दिवंगत नेते करुणानिधी यांचा पक्ष असलेल्या डीएमकेने ( DMK ) ने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. त्यामुळे इथली लढत रंगतदार होणार आहे.