शशिकला यांना धक्का, तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे दोन्ही गट एकत्र

सामना ऑनलाईन । चेन्नई

अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर दोन गटांत विभागलेला अण्णाद्रमुक पक्ष पुन्हा एकत्र झाला आहे. त्यामुळे जयललिता यांच्यानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शशिकला यांना धक्का बसला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी काही अटींवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे पलानीसामी यांच्याकडे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची तर पन्नीरसेल्वम यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येणार आहे. परस्पर चर्चेअंती दोन्ही गटांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांतील निवडक नेत्यांना मंत्री करण्याचा निर्णय झाला आहे.