भीषण अपघातात खासदाराचा मृत्यू

सामना ऑनलाईन, त्रिवेंद्रम

तमिळनाडूमध्ये ( AIADMK ) अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाच्या खासदाराचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. एस.राजेंद्रन असे या खासदारांचे नाव असून ते विल्लूपुरम मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत होते. 62 वर्षांचे राजेंद्रन हे त्रिवेंद्रमकडे येत असताना झालेल्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले आहे. राजेंद्रन यांची गाडी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात कसा झाला याची सध्या चौकशी सुरू आहे.