महालक्ष्मी महिला विकास संस्थेची केरळ पूरग्रस्तांना ५० हजारांची मदत

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण येथील महिलांनी एकत्र येत समाज कार्य करण्याच्या दृष्टीने श्री महालक्ष्मी महिला विकास संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी राधिका मनोज मोंडकर, तर सचिवपदी आदिती अरविंद सराफ यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने केरळ मधील पुरग्रस्तांसाठी मालवणमधून ५० हजार रुपये निधी गोळा करून केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आला.

मालवण येथील हॉटेल महाराजा येथे या संस्थेची बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थेची कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्ष- रविना रवींद्र मोंडकर, खजिनदार- मनिषा महादेव गावकर, सल्लागार- मानसी महेंद्र परुळेकर, सभासद- वैष्णवी विराज किर, सायली विनायक ओटवणेकर, विनिता विजय आटक, नेहा नयनकुमार कुडाळकर, प्रांजल प्रसाद कवटकर, नेहा नितीन हडकर, रविना रवींद्र कासले, रुचिता रुपेश हडकर, मिथिला महादेव हडकर, नम्रता हेमंत कांदळकर, प्रीती प्रकाश कासले, वंदना हरिश्चंद्र हडकर, मयुरी मंगेश दाभोळकर, रिया राजेश इब्रामपूरकर, माधुरी दिगंबर बंगार.

सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासाठी कार्य करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या कामाची सुरुवात मालवणमधून ५० हजार रुपयांचा निधी गोळा करून तो केरळ पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करून करण्यात आली.