Video- …आणि रणबीरचं नाव घेऊन लाजली आलिया!


सामना ऑनलाईन । मुंबई

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं नातं आता जवळपास जगजाहीर आहे. त्यांच्या लग्नाविषयी उलटसुलट चर्चाही अधूनमधून रंगत असतात. सध्या कलंक या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया व्यग्र आहे. पण तरीही ती रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसून येत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये ती वरुण धवनला चुकून रणबीर अशी साद घालताना दिसतेय.


View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt.x) on

कलंकच्या प्रमोशनसाठी आलिया आपले सहकलाकारांसह माध्यमांशी चर्चा करताना दिसून येत आहे. अशाच एका माध्यमाच्या मुलाखतीत वरुण धवन, आदित्य रॉयकपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासह मुलाखत देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आलियाच्या बाजूला बसलेला वरुण तिच्या केसांशी खेळायचा प्रयत्न करत होता. त्याला थांबवण्यासाठी आलियाने तोंड उघडलं पण वरुण ऐवजी तिच्या तोंडातून ‘रण..’ असं चुकून निघून गेलं. स्वतःला पटकन सावरत तिने ‘वरुण नको’ असं म्हटलं खरं, पण त्यानंतर सहकलाकार हसायला लागल्यावर तिने लाजून मान खाली घातली. सध्या या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळत असून नेटकरी रणबीर आणि आलियाच्या प्रेमात रंगताना दिसत आहेत.