जागा नसल्याचे सांगत एअर इंडियाने सात खेळाडूंना प्रवेश नाकारला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विमानाचे बुकिंग फुल्ल झाल्याचे कारण सांगून ७ नामवंत टेबलटेनिसपटूंना एअर इंडियाने विमानात प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे १७ पैकी ७ स्टार टेटेपटूंना आयटीटीएफ वर्ल्ड टूर ऑस्ट्रेलियन ओपन टेटेस्पर्धेला मुकावे लागले आहे .राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी मानिका बात्रा हिलाही या स्पर्धेला मुकावे लागले आहे.

सोमवारी सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ओपन टेटे स्पर्धेला मुकणाऱ्या हिंदुस्थानी टेबलटेनिसपटूंत मानिका बात्रासह शरथ कमल, मौमा दास, माधुरिका पाटकर, हर्मित देसाई, सुतीर्था मुखर्जी, सत्यान गनसेखर या खेळाडूंचा समावेश आहे. या प्रकाराच्या चौकशीची मागणी खेळाडूंनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे केली आहे.