दिवाळी बोनससाठी एअर इंडिया कर्मचार्‍यांचा संप, प्रवाशांना नाहक त्रास

1

सामना ऑनलाईन । मुंबई

एअर इंडियातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने अनेक विमानांनी उशिराने उड्डाण घेतले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कंत्राटी कामगारांना दिवाळीचा बोनस न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला त्यामुळे विमानांना उशीर झाला.

एअर इंडियाच्या ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेडच्या कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला आहे. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावर याचा परिणाम झाल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मुंबई बँकाँक ही फ्लाईट रात्री दोन वाजता निघणे अपेक्षित होती परंतु संपामुळे ही फ्लाईट उडण्यास तब्बल सात तास उशीर झाला.